७२५ किलो वजनाचा भोपळा….!!!

 
 
140929-pumpkin-7a_260104e094c2900b79ea7e95b32800ce
अमेरिकेच्या मिनोट शहरामध्ये १६०० पौंड म्हणजे सुमारे ७२५ किलोपेक्षा जास्त वजनाचा भोपळा पिकविण्यात आला आहे. डॅनी गेट्स नामक व्यक्तीच्या शेतात हा भोपळा उगवला असून अजूनही त्याची वाढ होत आहे. नॉर्थ डकोटा शहरातील आतापर्यंतचा हा सगळ्यात मोठा भोपळा असल्याचा दावा त्याने केला आहे. गेट्सने सांगितले की, १३ जूनला त्याच्या शेतातील वेलीवर हा भोपळा उगवला होता. तो एवढ्या झपाट्याने वाढत होता की, अवघ्या तासाभरात त्याच्या आकारात बदल झालेला दिसत असे. दररोज त्याच्या वजनात १५ ते २० किलोंनी भर पडत होती. एवढा महाकाय आकाराचा भोपळा पिकविणे गेट्ससाठी आव्हानात्मक काम होते. मात्र योग्य पद्धतीने केलेल्या नियोजनामुळे यात तो सफल ठरला. त्याचा मालक केल्विन बेरीने त्याला हे आव्हान दिले होते. त्यानंतर तो असा झपाटून कामाला लागला की, पाहता पाहता शेतात हा भलामोठा भोपळा अवतरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *