१६ हजार चप्पल-बुटांची मालकीण….!!!

               चप्पल-बूट सगळेच वापरतात व काही लोकांकडे तर त्याचे अनेक जोड असतात. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया शहरातील एका महिलेने मात्र याबाबतीत कमाल केली आहे. या महिलीकडे बूट व चप्पलांचे थोडेथोडके नव्हे तर तब्बल १६,४०० जोड आहेत. डर्लेन फ्लन असे या महिलेचे नाव असून एवढ्या चप्पल-बुटांचा संग्रह करून तिने अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. पादत्राणांची मोठी शौकिग असलेली डर्लेन ‘शू लेडी’ नावानेच ओळखली जाते. तिच्या घरात पाहाल तिथे चप्पल-बूट दिसतात. तिचे घर म्हणजे पादत्राणांचे दुकानच वाटते. केवळ जमवायचे म्हणून ती पादत्राणांचा संग्रह करीत नाही तर त्यांना कलात्मक रूपही देते.

              घराच्या सजावटीतही ती चप्पल-बुटांचा मोठ्या खुबीने वापर करते. घरातील फर्निचर, कपडे, कप व फोनलाही तिने बुटांचा आकार दिला आहे. ५९ वर्षीय फ्लनचे पादत्रानांबदलचे झपाटलेपण इथवरच थांबत नाही. २००६ मध्ये तिने ७७६५ पादत्राणांचा संग्रह करून जगातील अशा सर्वात मोठ्या संग्रहाच्या विक्रमाची नोंद केली होती. चप्पल-बूट सगळ्यांचीच गरजेची वस्तू आहे, पण फ्लनचे त्याबद्दलचे आकर्षण जगावेगळे आहे. पादत्राणे आपल्याला एवढे आकर्षून का घेतात, हे तिला स्वत:लाही सांगता येत नाही. मी फक्त त्यांच्यावर प्रेम करते. असे ती सांगते. २००१ मध्ये पतीशी घटस्फोट झाल्यानंतर तिने पादत्राणांच्या अनोख्या संग्रहास सुरुवात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *