दुर्गम डोंगरावर तो दाखवितो सायकलवर स्टंटबाजी…!!!

दुर्गम डोंगरावर तो दाखवितो सायकलवर स्टंटबाजी…!!!Danny-Macसायकल थरारक प्रात्यक्षिके दाखविणारे जगात अनेकजण असतील. स्कॉटलंडमधील डॅनी मॅकेस्किल नावाचा प्रख्यात सायकलस्वार सायकलवर ज्या करामती करतो, तशी हिंमत क्चचितच कुणी दाखवू शकतो. हल्लीच त्याने ऑईल ऑफ स्कायच्या दुर्गम डोंगररांगांमध्ये अशीच श्वास रोखून धरायला लावणारी स्टंटबाजी करून दाखविली. अर्थात अनेकजण त्याच्या करामतींवर विश्वास ठेवण्यास सहजासहजी तयार होत नाहीत. त्यासाठी २८ वर्षीय डॅनीने ७.५ मैल लांबीच्या आपल्या या सायकलस्वारीचे व्हिडीओ चित्रणही तयार केले आहे. युट्युबवर ‘द रिज’ नावाने ते पाहिले जाऊ शकते. ७.५ मिनिटांचा हा व्हिडीओ तयार करण्यासाठी त्याला दहा दिवस लागले. आपली मेकॅनिकची नोकरी सोडून डॅनी या व्यवसायात आला आहे. २००९ मध्ये डोव्सचा संगीत अल्बम विंटर हिलमध्येही तो चमकला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *