काया ही पंढरी , आत्मा पांडुरंग !!! (10 Facts About Pandharpur and Wari)

१. पंढरपूर मधील विठोबा मंदिर हे महाराष्ट्रातील गजबजलेल्या देवास्थानापैकी एक आहे . ह्या मंदिराची स्थापना कधी करण्यात आली या बद्दल नक्की माहिती नसली तरी अंदाज असा आहे कि हे मंदिर १३ व्या शतकात बांधले असावे .

VITTAL TEMPAL PANDHARPUR

२.कथा अशी सांगितली जाते कि पुंडलिक नावाचा तरुण आपल्या आजारी आई वडिलांना रस्त्याने घेऊन जात असताना एक दिव्य दृष्टी त्याला दिसली ज्यात गंगा आणि यमुना देवींनी त्याला त्याच्या आजारी आई वडिलांची सेवा करण्याचा सल्ला दिला .

ganga12

३.पुंडलीकाला आपली चूक कळली आणि देवींनी दिलेला सल्ला पटला .. पुंडलीकाने लागलीच आपल्या आई वडिलांची सेवा करायला सुरवात केली. पुंडलिक त्यांच्या सेवेत कुठेच कमी पडत न्हवता हे पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि पुंडलीकाला दर्शन देण्यासाठी निघाले .

220px-Vithoba_Pundalik

४.जेव्हा भगवान विष्णू पुंडलिकाच्या आश्रमाजवळ जावून जावून दार ठोतावतात तेव्हा आतून कोणीच दार उघडायला येत नाही कारण पुंडलिक आपल्या आई वडिलांना जेवण भरवत असतो त्यामुळे तो एक वीट घराबाहेर टाकतो आणि त्यावर उभे राहण्याचे आवाहन करतो कारण पुंडलीकाला माहित नसते कि सदर गृहस्त साक्षात भगवान विष्णू आहेत . परंतु भगवान विष्णू पुंडलिकाची ही सेवा बघून त्याला आशीर्वादरुपी वर देण्याचे ठरवतात .

fd68f35ea9b74ca4b2f1d6c00a263857

५.जेव्हा पुंडलिक डर उघडायला जातात तेव्हा ते साक्षात भगवान विष्णुना बघून आश्चर्यचकित होतात आणि उशिरा दार उघडल्याबद्दल माफी मागतात त्यावर विष्णू पुंडलीकाला म्हणतात ” काळजी करू नकोस, मी तुज्यावर प्रसन्न झालो आहे” . पुंडलिक विष्णुना विनवणी करतात कि आता तुम्ही देवलोक नाही तर पृथ्वीतलावर राहावं.

download (42)

६.भगवान विष्णूंनी त्याची विनंती मान्य केली आणि विठोबाचा अवतार घेतला जो विटेवरी उभा होता . आज पंढरपूर नगरीत साक्षात विष्णू ,विठुरायाच्या अवतारात त्यांच्या साऱ्या भक्तांना आशीर्वाद देतात .

large_b2

७.आषाढ महिन्यात आषाढी एकादशीचा हा दिवस विठुरायाचा प्रकट दिन म्हणून असंख्य भक्त ज्यांना वारकरी असे म्हणतात ते पंढरीच्या दिशेने पायी चालत विठोबाच्या चरणी नतमस्तक होतात .

pandharpur-wari-yatra

८.वारीची परंपरा ही ७ शतकं जुनी आहे जी संत ज्ञानेश्वर महाराज यांचे आजोबा त्र्यंबकपंत कुलकर्णी यांनी चालू केली होती. संत ज्ञानेश्वर, नामदेव, सावता माळी, साब्त तुकाराम यांच्यासह अनेक संत त्यांच्या कार्यकाळात वारीत सहभागी झाले आहेत .

1697018_b_9482

९.वारीत सहभागी झालेला प्रत्येक वारकरी हा एकमेकांना खऱ्या नावाऐवजी ‘माऊली’ याच नावाने हाक मारतात .

images (25)

१०.पंढरपूरला दक्षिण काशी असे ही म्हणतात जिथे देवांच्या दर्शनाने मोक्ष मिळतो असे भक्त मानतात .

What-to-see-in-Pandharpur

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *