धुक्यापासून पाणी मिळविण्यात आले यश….!!!

                  एका पक्ष्याच्या चोचेपासून प्रेरणा घेत शास्त्रज्ञांनी हिवाळ्याच्या दिवसांत पडणाऱ्या धुक्यापासून पाणी मिळविण्याची एक अनोखी व अतिशय प्रभावी पद्धत शोधून काढली आहे. शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, जगातील सर्वाधिक दुष्काळी देश सौदी अरेबियापासून पाणीटंचाईच्या समस्येने होरपळणाऱ्या पश्चिम अमेरिकेपर्यंत धुक्यापासून पाणी मिळविण्याची कल्पना लोकप्रिय होत आहे.

                  आता या प्रक्रियेमध्ये एक नवीन पद्धत पाणीटंचाईचा सामना कराव्या लागणाऱ्या लोकांची गरज म्हणजे जीवनासाठी आवश्क साधनसामग्रीची पूर्तता करण्यात मदत करेल. युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासचे शास्त्रज्ञ चेंग लुओ आणि त्यांचा विद्दार्थी शीन हेंग यांनी सांगितले की, पृथ्वीचा अर्धाअधिक भूभाग वाळवंट आणि अर्धशुष्क क्षेत्रांनी व्यापलेला आहे, त्यापैकी काही प्रदेशांमध्ये लोकांसाठी टँकरव्दारे पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा केला जातो. या लोकांसाठी भूमिगत वा पृष्ठभागातून पाण्याचा पुरवठा शक्य नाही. अशा परिस्थितीत पाणी मिळविण्याच्या दीर्घकालीन पद्धतीचा शोध घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी वायू आणि निसर्गाकडे आपला मोर्चा वळविला आहे.

 

Posted in:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *